हे वागणं बरे नव्हे, सेनेच्या राड्यावरून भाजपमध्ये मतभेद

October 19, 2015 8:59 PM0 commentsViews:

danve on sena3419 ऑक्टोबर : शिवसेनेनं पुन्हा एकदा पाकिस्तान विरोध दर्शवत तिसर्‍यांदा राडा घातलाय. भाजपने पुन्हा एकदा संयमी भूमिका घेतली खरी पण यावरुनही मतभेद उघड झाले. शिवसेनेचं हे वागणं बर नव्हे,त्यांच्या मताशी सहमत नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. एवढंच नाहीतर मुंबईत सामने खेळवल्यास आम्ही संरक्षण देऊ, असंही दानवे जाहीर केलं. पण दुसरीकडे
माधव भंडारी हे मात्र प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं मत मांडलंय.

आधी गुलाम अली यांचा कार्यक्रम, त्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांना पेंट फासलं आणि आज बीसीसीआयच्या कार्यलयात शिवसैनिकांनी राडा घातला. भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा सामने खेळवण्यासाठी आज पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये बैठक होणार होती. पण, ऐन वेळी शिवसैनिकांनी हल्ला चढवत ही बैठक रद्द केली. शिवसेनेच्या या भूमिकेवर वेगवेगळे पडसाद उमटत आहे. पण,मित्रपक्ष भाजपमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहण्यास मिळाले. याआधीही भारतात पाकिस्तानसोबत सामने होऊ नये किंवा पाक कलाकार असो अशा प्रश्नावर सेनेनं विरोध केला. पण, आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही अशी स्पष्ट भूमिका रावसाहेब दानवेंनी मांडली. आपलेही क्रिकेटपटू इतर देशात जात असतात. त्यामुळे सेनेचं असं वागणं बरं नव्हे असा खेद दानवेंनी व्यक्त केला. तसंच मुंबईत सामना खेळवायचा झाल्यास आम्ही त्याला संरक्षण देणार असंही दानवेंनी जाहीर केलं.

मात्र, त्याअगोदर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पाकिस्तानसोबत सामने खेळू नये यासाठी याआधीही निदर्शनं केलीये. त्यात गैर नाही अशी बाजू मांडली होती. तसंच या देशात प्रत्येकाला निदर्शनं आणि आंदोलनं करण्याचा अधिकार आहे. जर भारत-पाक सामने झाले नाही तर कोणतं आभाळ कोसळणार नाही असं ठाम मतही भंडारींनी व्यक्त केलं होतं.

एकंदरीतच गेल्या 25 वर्षांपासूनसोबत असलेल्या भाजपमधील काही नेत्यांनी सेनेच्या सवयी ओळखून याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं पण, दुसरीकडे सेनेच्या वारंवार अशा वागण्यामुळे आता भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close