46 एकर ऊस जळून खाक

October 19, 2015 9:27 PM0 commentsViews:

19 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील माडवगण फराटा या गावातील 46 एकरावरील ऊस शॉर्ट सर्किटमूळे जळून खाक झालाय. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांना हातात आलेल्या पिकाला मुकाव लागलंय. महावितरणच्या हाय व्होल्टेजच्या वायर एकमेकांमध्ये अडकल्याने शॉर्ट सर्किट झालं. महावितरणने जुन्या वायरिंगची योग्य काळजी न घेतल्याने शेतकर्‍यांना त्याचा ऊस गमवावा लागलाय. शेतकर्‍यांनी तारेवारची कसरत करुण गावकार्‍यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. महावितरणने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close