पेड न्यूज प्रकरणी मुख्यमंत्र्याची चौकशी

January 30, 2010 9:40 AM0 commentsViews: 2

30 जानेवारी पेड न्यूज प्रकरणी मुख्यमंंत्री अशोक चव्हाण यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने चौकशी केली. विधानसभा निवडणुकीत पैसे देऊन बातम्या आणि पुरवण्या छापून आणल्या या आरोपावरून प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या, दोन सदस्यीय समितीने मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची चौकशी केली. गुरुवारी वर्षावर जाऊन या समितीने मुख्यमंत्र्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी चव्हाण यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळल्याची माहिती समितीतले सदस्य प्रणंजय गुहा ठाकूर यांनी दिली. तसंच मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर टेपवर रेकॉर्ड करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

close