भारत-दक्षिण आफ्रिका सिरीजमधून अम्पायर आलीम दार यांची माघार

October 20, 2015 8:21 AM0 commentsViews:

Aleem-Dar

20 ऑक्टोबर : शिवसैनिकांनी काल (सोमवारी) मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात घातलेल्या राड्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आयसीसीने पाकिस्तानी अम्पायर आलीम दार यांना भारतातून परत बोलावलं आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या सुरू असलेल्या वन-डे मॅचसाठी आलीम दार यांनी अम्पायर म्हणून काम पाहिलं होतं. तसंच चेन्नईला 22 ऑक्टोबरला होणार्‍या चौथ्या आणि मुंबईला 25 ऑक्टोबरला होणार्‍या पाचव्या मॅचसाठीही ते अम्पायर म्हणून जबाबदारी पार पाडणार होते.

पण काल (सोमवारी) मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आलीम दार यांना परत बोलावण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. आलीम यांच्या जागी पर्यायी अम्पायरची निवड लवकरच जाहीर क रण्यात येईल, असंही आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी भारतात होणार्‍या टी-20साठी भारतात येणार्‍या पाकिस्तानच्या खेळाडूंमध्येही काळजी आहे. त्यांनी आपली चिंता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे व्यक्त केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तर आणि वसीम अकरम मुंबईतल्या वन डे सामन्यात कॉमेन्ट्री करणार नाहीत. शिवसेनेच्या पाकिस्तानविरोधातल्या आक्रमक भूमिकेमुळे हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close