बीसीसीआय आणि पीसीबीची आज दिल्लीत चर्चा

October 20, 2015 10:04 AM0 commentsViews:

shashank_thakur20 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात सोमवारी मुंबईत चर्चा होणार होती. मात्र शिवसेनेने घातलेल्या राड्यानंतर चर्चा रद्द करण्यात आली होती. शिवसेनेच्या विरोधानंतरही पीसीबीसोबत चर्चा मात्र होणार हे बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आज दिल्लीत ही चर्चा होणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्यात आज दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे. दिल्लीमध्ये चर्चा होणार असल्याचं आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी डिसेंबरमध्ये भारत-पाक मालिका युएईमध्ये खेळवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close