कृत्रिम पावसाचा प्रयोग गुंडाळला, 28 कोटी रुपये ‘पाण्यात’!

October 20, 2015 12:37 PM0 commentsViews:

Cloud Seeding

20 ऑक्टोबर : राज्यातला कृत्रिम पावसाचा प्रयोग थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ढगच नसल्याने हा प्रयोग थांबवण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे. एकूण 90 दिवसांचा हा प्रयोग होता. मात्र आता ढगच नसल्याने हा प्रयोग थांबवण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पुढच्या आठवड्यात सांगता होणार असून, लवकरच कृत्रिम पावसाची यंत्रणा आणि इतर सामग्री हलवण्यात येणार आहे.

14 दिवसांपासून विमान उभे असून, ढगांअभावी त्याचे कुठेही उड्डाण झालेले नाही. हवामान खात्याने मान्सून संपल्याचे जाहीर केले आहे. परिणामी, 27 कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग आता थांबवावा लागणार आहे. प्रयोग संपण्याची अधिकृत तारीख 4 नोव्हेंबर असली तरी आता पावसाळी ढग दाटून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रयोग आधीच गुंडाळण्यात येणार आहे.

सुमारे 110 तास विमानाने प्रयोग करून 950 मि.मी.पर्यंत पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कराराच्या 50 टक्केच उड्डाण झाले असून, 13 कोटी 50 लाख रुपयांचा जास्तीचा खर्च सरकारला कंत्राटदार कंपनीला द्यावा लागणार आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या या प्रयोगासाठी ‘खरं’पाणी पडलं अशी चर्चा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close