‘माय नेम इज खान’ला शिवसेनेचा वाढता विरोध

January 30, 2010 12:15 PM0 commentsViews: 1

30 जानेवारी 'माय नेम इज खान' या शाहरूख खानच्या सिनेमाला शिवसेनेने आता आपला विरोध तीव्र केला आहे. कांदिवलीतील सिनेमेक्स थिएटरमधल्या 'माय नेम इज खान' या सिनेमाचे पोस्टर्स शिवसैनिकांनी जाळले. सिनेमॅक्सचा थिएटरच्या मॅनेजरला शिवसैनिकांनी धमकी दिली. मनमाड शहरातही शिवसेना आणि विद्यार्थी सेनेने शाहरुख खानचे पोस्टर्स जाळले. घोषणाबाजी करत नाशिक जिल्ह्यात शाहरूख खानचे चित्रपट झळकू देणार नाहीत असा इशारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान यांनी दिला. याप्रकरणी 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारवाई कधी करणार – हुसेन दलवाई शिवसैनिकांवर कारवाई कधी करणार असा सवाल काँग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी केला आहे. शिवसेनेने कांदीवली येथे केलेल्या 'माय नेम इज खान'खान सिनेमाच्या विरोधातील आंदोलनाची सरकारने दखल घेत कडक कारवाई करावी. या प्रश्नावर आपण स्वत: गृहमंत्र्याशी फोन करुन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ज्या विभागात हे आंदोलन झालं तेथील पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली. भाषा, सिनेमा, नाटक यांच्यावर राजकीय सेंसॉरशिपही अतिशय निंदनीय प्रकार असल्याचंही ते म्हणाले.

close