माजी राज्यमंत्री खंदारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

February 1, 2010 8:59 AM0 commentsViews: 3

1 फेब्रुवारीमाजी क्रीडा राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 21 वर्षांच्या एका तरुणीनं खंदारे यांच्या विरोधात ही तक्रार केली आहे.या प्रकरणात आता खंदारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. सोलापूरच्या उजनी गेस्ट हाऊसमध्ये आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा आरोप या तरुणीनं केलाय. माजी आमदार खंदारे यांनी संध्याकाळी गेस्ट हाऊसमध्ये बोलावून आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला पण खंदारे याच्या तावडीतून सुटून गेस्ट हाऊसच्या किचनमध्ये आपण स्वत:ला कोंडून घेतल्यानं बचावलो, असं या तरुणीनं सांगितलं. उत्तमप्रकाश खंदारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते क्रीडाराज्यमंत्री होते. दरम्यान, आता या प्रकरणी उत्तमप्रकाश खंदारे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलाय. सोलापूर कोर्टात त्यांनी जामीनासाठी अर्ज केलाय.

close