अखेर नागपूरमधील नमो बारवर सहा महिन्यांची बंदी

October 20, 2015 5:24 PM0 commentsViews:

nagpur_namo_bar20 ऑक्टोबर : अखेर नागपूरमधल्या नमो बार वर बंदी घालण्यात आली आहे. या बारवर आता 180 दिवस बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. या बारवरच्या बंदीसाठी स्थानिक महिला गेली दीड वर्ष आंदोलन करत होत्या. या बार समोरच मुख्य बस स्टाँप आणि शाळासुद्धा आहे.

नागपूरच्या गोधनी परिसरात नमो बियर बारच्या विरोधात महिलांनी आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व करणार्‍या भाजपचे आमदार समीर मेघे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रगती पाटील यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर आंदोलन करणार्‍या 33 महिलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. आनंद सिंग याने आपल्या बिअर बारला नमो नाव दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असल्याचा आक्षेप भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तर या ठिकाणी बारच नको म्हणून महिला आंदोलन करत आहेत.

पण नमो या नावाचा संबध नरेंद्र मोदी यांच्यासोबत नाही तर ओम नमो शिवायमधील हे नमो घेण्यात आल्याचं बार मालकाचं म्हणणं आहे. जो पर्यंत हा बार बंद होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याच आंदोलक महिलांनी स्पष्ट केलं होतं. अखेर या महिल्यांच्या आंदोलनाला यश आले असून सहा महिने या बारवर बंदी घालण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close