आली लहर केला कहर, आयसीयूमध्ये डॉक्टर-नर्सनी खेळला गरबा

October 20, 2015 5:59 PM0 commentsViews:

20 ऑक्टोबर : नवरात्रात मोकळी मैदानं, सोसायट्यांचे आवार, मॉल्स अशा अनेक ठिकाणी सध्या गरब्याची धूम पहायला मिळतीये. पण अहमदाबादमध्ये मात्र चक्क एका हॉस्पिटलमध्येच कर्मचार्‍यांनी फेर धरला.hospital garba4

सोला हॉस्पिटलमध्ये संपूर्णपणे एअरकंडिशन्ड असं डायलिसीसी सेंटर उघडण्यात आलं. रुग्णांना स्वस्त दरात आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी हे सेंटर उघडण्यात आलंय. पण उद्घाटन सोहळा सुरू असतानाच कर्मचार्‍यांनी गरबा खेळायला सुरुवात केली. आयसीयू वॉर्डमध्ये हा गरबा रंगला होता. आता यावर काय प्रतिक्रिया येतायेत हे पहायला हवं..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close