हरियाणामध्ये दलित कुटुंबाला जिंवत जाळलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू

October 20, 2015 6:19 PM0 commentsViews:

 faridabad family420 ऑक्टोबर : हरियाणा जिल्ह्यातील फरिदाबादमधील माणुसकीला काळीमा फासण्याची घटना घडलीये. एका दलित कुटुंबाला जातियवादी गुंडांनी जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना घडलीये. यात दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय.

सुनपेड गावात जातीयवादातून एका दलित कुटुंबाला जिवंत जाळण्यात आलं. यात दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय. जातीय वादातून ही घटना घडली. यात आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे. जितेंद्र आणि त्याचं कुटुंब राहत असलेलं घर काही अज्ञात व्यक्तींनी आज पहाटे पेट्रोल टाकून त्यांंना जिवंत जाळले. या घटनेत  4 जण जखमी झाले होते. जखमींना त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यात दोन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close