‘प्रियांकाच माझी वारसदार, इंदिरा गांधींनी व्यक्त केली होती इच्छा ?

October 20, 2015 6:51 PM0 commentsViews:

priyanka gandhi20 ऑक्टोबर : प्रियांका गांधी याच आपल्या राजकीय वारसदार असतील, असं इंदिरा गांधी यांना वाट होतं असा गौप्यस्फोट त्यांचे जवळचे सहकारी एम.एल.फोतेदार यांनी केलाय.

इंदिरा गांधी यांचे निष्ठावंत सहकारी फोतेदार यांचं ‘चिनार लिव्ह्‌ज’ हे पुस्तक 30 ऑक्टोबर रोजी प्रकाशित होणार आहे. या आगामी पुस्तकात फोतेदार यांनी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. काश्मीरच्या भेटीवर असताना इंदिरा गांधी यांनी प्रियांकाबद्दलचं मत आपल्याजवळ व्यक्त केल्याचं फोतेदार यांनी म्हटलंय. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर फोतेदार यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. आणि इंदिरा गांधी यांनी प्रियंका यांच्याबद्दल काय वाटत होतं, ते सांगितलं होतं. पण त्यामुळे सोनिया गांधी रागावल्या, असा दावा फोतेदार यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close