मराठवाड्याला पाणी सोडण्यास हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

October 20, 2015 7:23 PM0 commentsViews:

 jaikwadi dam_water20 ऑक्टोबर : मराठवाड्याला पाणी सोडण्याला मुंबई हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. 26 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडू नका, असे आदेश कोर्टाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय, पण मराठवाड्याच्या लोकांची चिंता वाढली आहे.

गोदावरी पाटबंधारे महामंडळाने मराठवाड्याला नाशिक आणि नगरमधील धरणातून 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात नाशिक आणि नगरमधील शेतकरी रस्त्यावर उतरले होते. एवढंच नाहीतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनाही आंदोलनात उतरली होती. अखेर वाद हायकोर्टात पोहचला. प्रवरा, संजिवनी, कोपरगाव, संगमनेर साखर कारखान्याच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने आज तात्पुरती स्थगितीचा निर्णय दिला आहे. उर्वरित कारखान्याच्या याचिकेवर 23 तारखेला सुनावणी होईल.

दरम्यान, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी सोडणारच आणि जर नाही सोडलं तर न्यायालयाचा अवमान होईल अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close