भाजप-सेनेत जुंपली : मुद्दा मुंबई आणि मराठीचा

February 1, 2010 11:12 AM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारीमुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावरून आता शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपलीय. मुंबईतल्या उत्तर भारतीयांना संरक्षण देण्याची घोषणा संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी केलीय. तर मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, आम्हाला संघानं अस्मिता शिकवू नये, असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय. माधवअण्णांनी जरा कर्नाटक सीमा भागातल्या मराठी माणसांवर होणा-या अत्याचारांबाबतही तोंड उघडावं, असा टोलाही उद्धव यांनी हाणलाय. दुसरीकडं आम्हालाही मराठीचा अभिमान आहे, पण भाषेचं राजकारण कुणीही करु नये, असं मत भाजप नेते नितीन गडकरींनी व्यक्त केलंय. त्यामुळं आता सेना-भाजपमधले संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

close