हद्द झाली ; आता मिठावर चोरांचा डल्ला, 22 पोती केली गायब

October 20, 2015 10:32 PM0 commentsViews:

20 ऑक्टोबर : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. असाच किस्सा पुण्यात घडला. पिंपरी चिंचवडमध्ये चोरांनी सोनं, नाही चांदी नाही तर मीठ चोरी केलं. देहुरोडवर दुकानं बाहेर ठेवेलेल्या 22 मिठांची पोती चोरांनी पळवली. solt34विशेष म्हणजे या 22 गोण्या चोरांनी दुचाकीवर एक-एक करून चोरून नेल्यात. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. चोरांच्या हा प्रताप पाहून व्यापारीही अचंबित आणि संतप्त झाले. अलीकडेच कांदा चोरीच्या घटना घडल्यात. काल तर नागपुरात तूरडाळ चोरीला गेली. आणि पुण्यात आज मीठ चोरीला गेलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close