जन्मानं मराठी असणा-यालाच महाराष्ट्रात नोकरी द्या- राज ठाकरे

February 1, 2010 11:53 AM0 commentsViews: 78

1 फेब्रुवारीजन्मानं मराठी असणा-यालाच महाराष्ट्रात नोकरी द्यावी, ही भूमिका राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मांडलीय. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी यूपी बिहारवाल्यांना मनसे मराठी शिकवण्याच्या वगैरे भानगडीत पडणार नाही. मनसे कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची आंदोलनं परस्पर करू नयेत, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या. उत्तर भारतीयांवरून शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे काही बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण राज ठाकरे यावर काहीच बोलले नाहीत.

close