साठेबाजीला बसणार चाप, डाळी आणि खाद्यतेल अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित

October 20, 2015 11:37 PM0 commentsViews:

soters420 ऑक्टोबर : केंद्र सरकारने काही गोष्टी अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित केल्या आहेत. त्यात डाळी आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. त्यामुळे डाळी आणि खाद्यतेलाचा एका मर्यादेपलीकडे साठा करता येणार नाही. घाऊक व्यापार्‍यांसाठी 2000 क्विंटल आणि किरकोळ व्यापार्‍यांसाठी 200 क्विंटल साठ्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या काहीदिवसांत ठाणे, पुणे,रायगड, सातारा, अमरावती, नागपूर, मुंबई या ठिकाणी धाडी टाकून साठवलेला माल जप्त केलाय. साठेबाज आणि काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात मोक्का आणि ‘एपीडीए’अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आज अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची भेट घेतली. डाळीचे भाव नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. डाळी बाबतीत आम्ही पॅकेज देण्याचा विचार करतोय. तूर ही भारता व्यतिरिक्त इतर ठिकाणी फार खाल्ली जात नाही. 5000 क्विंटल तूरडाळ आयात करण्याचा विचार सुरू आहे असं आश्वासन बापट यांनी दिलं. तसंच मॉल्सच्या साठ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. साठेबाजारातला आणि काळेबाजारातला माल बाहेर आल्यावर डाळींच्या किमती कमी होतील असंही गिरीष बापट यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close