ठाणे जिल्ह्यात आजपासून 30 टक्के पाणी कपात

October 21, 2015 7:49 AM0 commentsViews:

water-shortage MUMBAI

21 ऑक्टोबर : यंदा तलावक्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्यामुळे ठाणे जिल्ह्याला आजवरच्या सर्वात मोठ्या पाणीकपातीला तोंड द्यावं लागणार आहे. आज, बुधवारपासून जिल्ह्यात सुमारे 30 टक्के कपातीला सुरुवात होणार आहे. यापुढे जिल्ह्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहील.ऑक्टोबर महिन्यात तब्बल 30 टक्के पाणीकपात लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ठाणे जिल्ह्यात यंदा 24 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाण्याचा जलकुंभ असलेले बारवी धरण भरू शकलेले नाही. त्यातच यंदा आंद्र धरणही निम्मे कोरडेच राहिले. त्याचा फटका आज, बुधवारपासून बसणार असून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर आणि मिरा-भाईंदर या महापालिकांसह अंबरनाथ – बदलापूर या नगरपरिषदांच्या हद्दीतही आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

कपात कुठे, कधी ?

गुरुवार, शुक्रवारः ठाणे, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई महापालिकांसह, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका, वागळे इस्टेट, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापूर आणि तळोजा या औद्योगिक क्षेत्रांमध्ये, डोंबिवलीलगतची 27 गावे

मंगळवार, शनिवार : कल्याण, डोंबिवली

बुधवारी संपूर्ण दिवसः ‘स्टेम’ (शहाड-टेमघर पाणीपुरवठा प्राधिकरण) अंतर्गत येणारा भाग

याशिवाय दररोज 14 टक्के कपात : ठाणे, भिवंडी व मिरा-भाईंदरचा काही भागाचा समावेश

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close