पानसरे हत्या प्रकरण : पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे

October 21, 2015 10:42 AM0 commentsViews:

pansaren;rjwehuih

21 ऑक्टोबर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी लंडनमध्ये करण्यात आली आहे.

या तपासणीत पानसरेंच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाबद्दल पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या समीर गायकवाडची न्यायालयीन कोठडी 23 ऑक्टोबरला संपणार आहे. या पार्श्वभुमिवर पोलिसांना मिळालेले धागेदोरे महत्वाची भूमिका बजाऊ शकतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close