मियाँदादला स्नेहभोजन देणा-या शिवसेनाप्रमुखांनी माफी मागावी- मलिक

February 1, 2010 12:19 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारीकुख्यात गुंड आणि दाऊद इब्राहिमचा व्याही असलेल्या जावेद मियाँदादला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घरी स्नेहभोजन दिलं. त्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा देशाची माफी मागावी. नंतरच शाहरूख खानला देशभक्तीचे धडे द्यावेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केलीय. औरंगाबाद इथं एका समारंभासाठी आले असताना त्यांनी बाळासाहेबांच्या या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली.

close