द्विपक्षीय संबंध सुधारण्यात भारताचा प्रतिसाद निराशाजनक- नवाज शरीफ

October 21, 2015 2:15 PM0 commentsViews:

nawaz sharif

21 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तन या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी भारताचा प्रतिसाद निराशाजनक असल्याचं पाकिस्तानचे अध्यक्ष नवाज शरीफ यांनी सांगितलं आहे. शरिफ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानी नागरिकांसमोर बोलताना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये नवी दिल्लीकडून निराशाजनक प्रतिसाद मिळत आहे. काश्मीर हा दोन्ही देशांतला कळीचा मुद्दा आहे आणि दोन्ही देशांत शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी हा मुद्दा निकाली काढायला हवा, असं त्यांनी म्हटलं आहे. नवाज शरीफ हे चार दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर असून ते 22 ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close