झेंडू यंदा ‘भाव’ खाणार

October 21, 2015 3:27 PM0 commentsViews:

21 ऑक्टोबर :  दसर्‍याचा आणि दिवाळीचा सण आल्यानंतर आता बाजारात गर्दी झालीये ती झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी. पण यावर्षी दुष्काळाच्या परिस्थितीमुळे झेंडूचं उत्पादन चांगलंच घटलंय. त्यामुळे झेंडू आता महागणार आहे. दिवाळी या सणात झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. पुरंदर तालुक्यातल्या जेजुरी शहरात दसरा सणाला झेंडूच्या फुलांचा मोठा बाजार भरतो. मुंबई , पुणे या शहरांसह कोकणातून अनेक व्यापारी झेंडूच्या खरेदीसाठी पुरंदरच्या झेंडू उत्पादक शेतकर्‍यांकडे दाखल होतात. माळरानांवर केवळ ठिबक सिंचनावर डाळींब आणि आलं या पिकांमध्ये झेंडूच्या फुलाचं आंतरपीक म्हणून भरमसाठ उत्पादन घेतलं. दुष्काळी स्थितीमुळे यंदा पुरंदरच्या शेतक-यांना झेंडूचं उत्पादन घेण कठीण झालं होत. परिणामी उत्पादन घटल असताना झेंडूची मागणी बाजारपेठेत वाढली. झेंडू उत्पादक शेतक-यांकडून व्यापारी जागेवर शेतातच 40 रुपये ते 50 रुपये प्रतिकिलोने झेंडूची खरेदी करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close