दारू पिऊन गाडी चालवणा-यांना मुंबई पोलीस धडा शिकवणार

February 1, 2010 12:31 PM0 commentsViews: 5

1 फेब्रुवारीदारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून पादचा-यांचा जीव घेणा-यांना मुंबई पोलिसांनी चांगलाच धडा शिकवायचं ठरवलंय. पहिल्यांदाच दारु पिऊन गाडी चालवताना आढळलेल्या लोकांना दुप्पट शिक्षा देण्यात यावी. तसंच त्यांच्याकडून दहापट अधिक दंड आकारण्यात यावा अशी शिफारस मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी केलीय. म्हणजेच आता ही शिक्षा 6 महिन्यांवरुन 3 वर्षांवर, तर दंडाची रक्कम 2 हजारांहून 10 हजारांवर नेण्याची शिफारस पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावात करण्यात आलीय.

close