अखेर अजित पवार एसीबी कार्यालयात हजर

October 21, 2015 6:29 PM0 commentsViews:

5ajit_pawar_chitale_commette21 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यानंतर आता अजित पवार चौकशीसाठी एसीबीसमोर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) गेले आहे.  आज दुपारी अजित पवार मुंबईतील एसीबीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.

अजित पवार आणि सुनील तटकरे यांना एकाच वेळेस समन्स बजावण्यात आलं होतं. चौकशीला हजर राहण्याबाबत एसीबीनं हे समन्स बजावले होतं. पण, आतापर्यंत अजित पवार यांनी आपल्या वकिलामार्फत उत्तरं देऊन प्रत्यक्ष चौकशीला हजर राहण्याचं टाळलं होतं. आज मात्र अजित पवार चौकशीला हजर झाले आहेत. कोंडाणेसह 12 प्रकल्पांमधल्या घोटाळ्यांबाबत ही चौकशी सुरू आहे. सुनील तटकरे चौकशीमध्ये एसीबीला सहकार्य करतायेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close