वांद्रे संकुलात ‘एमआय 17′ हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

October 21, 2015 6:27 PM0 commentsViews:

mi 1721 ऑक्टोबर : मुंबईतील वांद्रे संकुलात आज दुपारी भारतीय नाैसेनेचं एम आय 17 या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या हेलिकॉप्टरमधील सर्व चार जवान सुखरुप असल्याची माहिती मिळतीये.

हवाई विभागातील तांत्रिक विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी या हेलिकॉप्टरचा ताबा घेतला आणि झालेल्या तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती करण्यास सुरुवात केलीये. अचानक उतरलेल्या हेलिकॉप्टरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी बघ्यांनी ऐकच गर्दी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close