महालक्ष्मी नव्हे तर अंबाबाई, नावावरुन वाद सुरूच

October 21, 2015 6:39 PM0 commentsViews:

kolhapur mahalaxmi421 ऑक्टोबर : कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या नावावरुन सुरू झालेला वाद अजूनही मिटलेला नाही. देवीचं खरं नावं हे अंबाबाई असून तिला महालक्ष्मी करण्यात आल्याचा आरोप अंबाबाई भक्त मंडळानं केलाय.

कोल्हापूपरमध्ये शोध अंबाबाईचा हा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. अंबाबाईला लक्ष्मी करण्याचा जो कुटील डाव रचण्यात आलाय तो हाणून पाडू असा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आलाय. अंबाबाई ही बहुजनवादी संस्कृतीची देवी असतानाही तिला तिरुपती
बालाजीची पत्नी ठरवण्यात आलं, हे सर्व व्यावसायिक उद्देश ठेवूनच करण्यात आल्याचा आरोप भक्त मंडळांनी केलाय. तसंच संवर्धन प्रक्रियेनंतर देवीच्या डोक्यावर जी नागाची प्रतिकृती होती ती गायब झाल्यानं ही प्रतिकृती त्वरित तयार करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आलीय. त्यामुळं देवीच्या भक्तांमध्ये आता देवीच खरं नाव काय असा प्रश्न पडतोय.

तिरुपती बालाजी मंदिराकडून शालू भेट

दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिराकडून दरवर्षी देवीला शालू भेट दिला जातो. हा शालू महालक्ष्मी देवी तिरुपतीची पत्नी म्हणून नव्हे तर आई म्हणून अपर्ण केल्याचे स्पष्टीकरण देवस्थान समितीनं केलंय. यंदाही पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत हा शालू मंदिरात दाखल झाला. आज सकाळी या शालूची पुजा करुन हा शालू देवीला अर्पण करण्यात आला. दरम्यान, आज अंबाबामातेचा जागर असून रात्री तोफेची सलामी झाल्यावर चांदीच्या सजवलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा निघेल. त्यानंतर उत्सवमूर्तीची पालखी प्रदक्षिणा झाल्यावर ही नगरप्रदक्षिणा पूर्ण होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close