अनधिकृत वस्त्यांना झोपडपट्टीचा दर्जा द्या- मेधा पाटकर

February 1, 2010 12:56 PM0 commentsViews: 67

1 फेब्रुवारीमुंबईतील 1972 नंतरच्या अनधिकृत वस्त्यांना झोपडपट्टीचा दर्जा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलीय. तसंच एसआरए योजनेतील भ्रष्टाचार बंद व्हावा, अशीही मागणी त्यांनी केलीय. अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणा-या रहिवाशांनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. मुंबईतील वस्त्यांमध्ये राहणा-या या लोकांना हटवून बिल्डर त्यांच्या जागेवर बिल्डींग बांधतात आणि नफा कमावतात. पण त्यामुळे मोल-मजुरी करणा-या गरीब लोकांना मात्र बेघर व्हावं लागतं. त्याचप्रमाणे या वस्त्यांना झोपडपट्टीचा दर्जा नसल्यानं यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा किंवा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना झोपडपट्टीचा दर्जा द्यावा अशी मागणी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

close