सेनेला आवडेल की नाही माहिती नाही पण, ‘ती’ 27 गावं वगळणार -मुख्यमंत्री

October 21, 2015 7:30 PM0 commentsViews:

cmiaf21 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच डिवचलंय. ती 27 गावं महापालिकेतून वगळण्यात येणार असल्याचे संकेत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील सभेत दिले आहे.

राज्य सरकार जेव्हा या गावांविषयी निर्णय घेईल, तेव्हा या गावातील लोकांना तर निवडणुकीला सामोरे जावे लागणाराय, असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच हा निर्णय आमच्या मित्रपक्षांना आवडलेला नाही, त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे या 27 गावांचा प्रश्न सोडवता आला नाही. शिवसेनेला काय करायचं करू द्या, सरकार कोर्टात आली बाजू मांडेल, असा टोलाही शिवसेनेस लगावला.

1,000 कोटींची तरतूद करूनही जर पालिका या गावांचा विकास करू शकल नाही तर उपयोग काय?, असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केलाय.निवडणुकीला समोर जावं लागलं नसतं तर चागलं झालं असतं, कारण आज एक निवडणूक होतेय आणि उद्या राज्यसरकार निर्णय घेईल तेव्हा आपल्याला याच परिस्थिला समोरं जावं लागणार आहे असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने 27 गाव वगळण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close