झोपडपट्टी ते सिनेमा, ‘ख्वाडा’च्या ‘बानू’चा संघर्षमय प्रवास

October 21, 2015 9:45 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे

21 ऑक्टोबर : अनंत अडचणीचा सामना करत नॅशनल ऍवार्ड विनर ‘ख्वाडा’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित होतोय..या वाटचालीत अनेक ख्वाडे अर्थात अडचणी आल्यात अगदी चित्रपटातही मुख्य भूमिका करणार्‍या कलावंताचाही प्रवास तितकाच संघर्षपूर्ण आहे. ‘ख्वाडा’ या चित्रपटाची मुख्य नायिका बानू अर्थात वैष्णवी ढोरे, आजही झोपडपट्टीत राहते..विश्वास बसत नाहीना…याबद्दलचा हा आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट….khwada movie vaishnavi dhore

…ही आहे बहुचर्चित ख्वाडा चित्रपटाची नायिका….बानू अर्थात वैष्णवी ढोरे…पण, आता हीच बानू आजही झोपडपट्टीत राहते बरं…हे बघा तिचं पुण्याच्या कोथरूड भागातलं छोटसं घरं…घर कसलं खोलीच म्हणा की…वैष्णवीच्या घरात गेल्या गेल्याच तिला मिळालेल्या पुरस्कारांनी, ट्रॉफींनी भरलेलं कपाट दिसतं…यातच तिच्या कलागुणांची प्रचीती येते. खरंतर लहाणपणीच वैष्णवीच्या डोक्यावरचं
आईवडीलाचं छायाछत्रं हरवलेलं….आजोबांनीच तिचा सांभाळ केलाय. याच ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत ती लहानाची मोठी झाली. पण या अशा प्रतिकूल वातावरणातही तिने आपली अभिनयाची आवड कायम ठेवली. प्रायोगिक नाटकं. कथ्थक अशी दरमजलपर्यंत तिचा प्रवास आज नॅशनल ऍवार्ड विनर ख्वाडापर्यंत जाऊन पोहोचलाय.

अभिनव शाळेत शिकून तयार झालेल्या वैष्णवीला अनेकदा या झोपडपट्टीचा, आजोबांच्या कपड्याचा तिटकारा यायचा पण आज ते सगळं कसं क्षुल्लक आहे याचीही तिला जाणीव झालीय. ख्वाडाच्या प्रवासात ती बरंच काही शिकलीय.

वैष्णवीच्या या खडतर प्रवास अर्थातच तिच्या आजी -आजोबांचीही साथही तितकीच महत्वाची होती आणि आहे. आजोबांनी वैष्णवीला अभिनयाच्या क्षेत्रात मनसोक्त बागडू दिल्यानेच ती हा ख्वाडा पार करू शकलीय. वैष्णवीच्या या संघर्षमय ख्वाडाला भरपूर यश लाभो, हीच सदीच्छा…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close