दीक्षाभूमीवर आज धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

October 22, 2015 9:04 AM0 commentsViews:

Dikshabhumi

22 ऑक्टोबर : 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी ज्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात धम्मकांती घडवली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी देशभरातून जनसागर दीक्षाभुमीवर उसळला आहे. नागपूरात आज जवळपास 10 लाख लोक दीक्षाभुमीवर येण्याची शक्यता आहे.

डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे आयोजित सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम सांयकाळी 6 वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यंदाचा 59 वा वर्धापन दिन सोहळा आहे. यासाठी दीक्षाभूमी परिसर सज्ज झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर रोषणाई करण्यात आली आहे. तसंच लाखोंच्या संख्येने बौद्धबांधव नागपुरात दाखल झाले असून दोन दिवसांपासून दीक्षाभूमी गर्दीने फुलून गेली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध भागातून नागरिक येत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close