दिल्लीत आज ‘कार फ्री डे’

October 22, 2015 10:35 AM0 commentsViews:

CR5yVHFUwAAi54n

22 ऑक्टोबर : दसर्‍याच्या मुहुर्तावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) सायकल रॅलीकाढत ‘कार फ्री डे’ साजरा केला. दिल्लीमध्ये दर महिन्याच्या 22 तारखेला ‘कार फ्री डे’ साजरा करण्यात येणार आहे. राजधानीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी केजरीवाल यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या रॅलीत मुंख्यमंत्र्यांसह दिल्लीचे मंत्री आणि आमदारांनीही सहभाग घेतला. आज सकाळी 7 वाजता केजरीवाल आपल्या सहकार्‍यांसह लाल किल्यापासून सायकल रॅलीला सुरवात केली. लालकिल्ला ते इंडिया गेट अशी ही सायकलफेरी काढण्यात आली होती. तर दिल्लीकरांनीही कार-फ्री-डेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close