आंध्राची नवीन राजधानी अमरावती

October 22, 2015 2:53 PM0 commentsViews:

dasdknasjkhdy

22 ऑक्टोबर : विजयादशमीच्या मुहूर्तावर आंध्रप्रदेशची नवीन राजधानी ‘अमरावती’चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं.

हैदराबाद इथल्या गुंटूर जिल्हयात तुंडूर तालुक्यात अडीचशे हेक्टर जमिनीवर कृष्णा नदीच्या तीरावर आंध्रची ही नवी राजधानी अस्तित्वात येणार आहे. आंध्रप्रदेशची ही नवीन राजधानी वर्ष 2024 पर्यंत स्मार्ट सिटी म्हणून तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या स्मार्ट सिटीसाठी 33000 एकर जमीन घेण्यात आली होती.

दरम्यान, या नव्या राजधानीला सिंगापूरचं स्वरूप देण्यात येणार आहे. सिंगापुर आणि टोकीयो सारखं अत्याधुनिक सोईचं स्मार्ट शहर बनविण्यासाठी चंद्राबाबूंनी जय्यत तयारी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close