‘सामना’तल्या पत्रकाराची आत्महत्या

February 1, 2010 3:14 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारीमुंबईच्या सामना वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कामावर असलेल्या 28 वर्षीय मनिष केळकर यांनी आत्महत्या केलीय. परळ भागातल्या आपल्या राहत्या घरी मनिषनं सकाळी साडेदहाच्या सुमारास नॉयलॉनच्या दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना घडली त्यावेळी घरी कुणीही नव्हतं. मनिषचे वडील सुरेश केळकर हे सामना वृत्तपत्राचे मुख्य छायाचित्रकार आहेत. मनिषनं एका वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती, सुरेश केळकर यांनी पोलीस जबाबात दिली आहे. भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये सुरेश केळकर यांचा जबाब नोंदवून घेण्यात आलाय. मनिषच्या पश्चात वडील, आई, पत्नी आणि सव्वा वर्षाचा मुलगा आहे. याप्रकरणातलं सत्य बाहेर येऊन केळकर कुटुंबियांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

close