अशोक सादरे आत्महत्येप्रकरणी सागर चौधरीविरोधात गुन्हा दाखल

October 22, 2015 6:27 PM0 commentsViews:

jalgaon_ashok_sadare22 ऑक्टोबर : जळगाव रामानंद पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात वाळू व्यावसायिक सागर चौधरीविरुद्धही शनिवारी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसुलाच्या वसुलीतून एका मंत्र्यांच्या समर्थकाकडून वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता. या मंत्र्यांकडून माझ्या पतीचा छळ झाला, असा आरोप सादरे यांच्या पत्नीने शनिवारी नाशिकमध्ये केला होता. याप्रकरणी खडसे यांना छेडले असता, सादरे प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा फलक लावणारा सागर चौधरी हा भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्टीकरणही खडसे यांनी दिलं होतं. पण या सागर चौधरीचा खडसेंशी जवळचा संबंध होते हे काही फोटोंमधून समोर आलंय. हे फोटो व्हॉटस्‌ऍपवर वायरल झाले आहे. पण, खडसेंनी मात्र ही जवळीक नाकारलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close