कुणी कुत्र्याला दगड मारला तर सरकार जबाबदार कसं?, व्ही.के.सिंगांच्या विधानाने वादंग

October 22, 2015 6:51 PM0 commentsViews:

v k singh22 ऑक्टोबर : हरियाणामध्ये दलित हत्याकांड प्रकरणावर केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. दलित मुलांच्या मृत्यूबद्दल सरकारचा काही संबंध नाही. जर उद्या कुत्र्याला कुणी दगड मारला तर त्याला सरकार जबाबदार कसं राहु शकतं अशी मुक्ताफळं सिंग यांनी उधळली. सिंग यांच्या या वक्तव्यामुळे वादंग उठललं होतं. पण, त्यानंतर त्यांनी आपला माफीनामा सादर केला.

फरिदाबादमध्ये एका दलित कुटुंबाला जिंवत जाळण्यात आलं. या घटनेत दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. याबद्दल व्ही.के. सिंग यांना
दलितांवर होणार्‍या अत्याचाराचा घटना हे सरकारचं अपयश नाही का ? अशी विचारणा केली असता. या प्रकरणाचा सरकारशी काहीही संबंध नाही. दोन कुटुंबातील हा वाद आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. उद्या जर कुणी कुत्र्याला दगड मारला तर त्याला सरकार कसं जबाबदार राहिलं असं सिंग यांनी म्हटलं होतं. या प्रकरणावर वाद निर्माण झाल्यानंतर सिंग यांनी सारवासारव केली. माझ्या विधानामुळे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल आपण माफी मागतो असं सिंग म्हणाले. तसंच अशा प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मीडियानेही माझ्या विधानाचा विपर्यास करू नये. मी जे काही सांगितलं ते स्पष्टपणे सांगितलं होतं त्यात कोणताही हेतू नव्हता अशी बाजूही सिंग यांनी मांडली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close