अत्याचाराविरोधात राजापूरमधल्या अल्पवयीन मुलीचा एकाकी लढा

October 23, 2015 10:03 AM1 commentViews:

23 ऑक्टोबर : महिला सुरक्षेसंदर्भात सरकारकडून मोठं मोठी आश्वासन दिली जातात. पण आजही महिला आणि मुलींची सुरक्षा वार्‍यावरच आहे. सुरक्षा तर सोडा पण अत्याचार झाल्यानंतर त्यांना न्यायही मिळत नाही. समाज, पोलीस प्रशासन आणि आई-वडिलांनी साथ सोडली तर त्या अत्याचार झालेल्या मुलीनं करावं काय? हा प्रश्न पडलाय तो राजापूर तालुक्यातील पाचल, पांगरी खुर्द गावात राहणार्‍या 15 वर्षांच्या मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केला आहे. या आरोपींमध्ये गावातील पोलीस पाटलाचाही समावेश आहे. याप्रकरणी सुभाष भिवाजी जाधव, सयाजी भिवाजी जाधव आणि प्रशांत यशवंत जाधव यांच्याविरोधात राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

rape victim
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पांगरी खुर्द गावात राहणार्‍या एका अल्पवायीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. या पिडीत मुलीवर जून महिन्यांत तब्बल चार वेळस बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, यातला एक आरोपी खुद्द तिचा काका आहे. इतकंच नाही तर तो गावचा पोलीस पाटीलही आहे. या पीडित मुलीनं यासंदर्भात अनेकदा तक्रार दाखल करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तिच्या आई-वडिलांनीही तिची साथ द्यायला नकार दिला. दुसरीकडे आरोपींनी तक्रार मागे घे नाहीतर जीवाचं बरंवाईट करू, अशा धमक्याही दिल्या.

दरम्यानच्या काळात पीडित मुलगी मुंबईत आपल्या चुलत काकाकडे राहण्यासाठी गेली. तेव्हा तिला त्रास होऊ लागल्याने तिच्या काकांनी तिला मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यावेळी पीडित मुलीने घडलेला सगळी प्रकार काकांना आणि डॉक्टरांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबईचतल्या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलीस ठाण्यातून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजापूर पोलिसांकडे पाठवण्यात आलं आहे.

आरोपींची सगळी माहिती देऊनही सगळे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. तर ही पीडित अल्पवयीन मुलगी जिवाला धोका असतानाही स्वत:वर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात दाद मागण्यासाठी लढत आहे. यासंदर्भात भोईवाडा पोलिसांनी मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून हे प्रकरण राजापूर पोलिसांकडे पाठवलं आहे. राजापूर पोलिसांनी याप्रकरणी सुभाष जाधव, सयाजी जाधव आणि प्रशांत जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम 376 (अ) 34, बाल अत्याचार अधिनियम 4, 6, 17 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पण अजूनही या नराधमांपैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.आता त्या मुलीला न्याय हवा आहे आणि त्यासाठी IBN लोकमत तिला साथ देणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Anonymous

    This news is flashing since last 3 days in different newspapers. Why the Rapists are still not arrested?? Just because one of them is employed as “Police Patil”?? Are we waiting for them to find secure place to runaway & then the police will take action.

close