अभिजित भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

October 23, 2015 7:58 AM0 commentsViews:

abhijijt bhattacharya

23 ऑक्टोबर : वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारा गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 34 वर्षांय महिलेने काल (गुरूवारी) रात्री मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिजित भट्टाचार्यविरोधात तक्रार दाखल केली. मुंबईतील लोखंडवाला परिसरात अभिजित यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

लोखंडवाला येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गात्सोवाच्या मंडपात हा प्रकार घडला. अभिजित भट्टाचार्य या उत्सवाच्या आयोजकांपैकी एक आहेत. उत्सवादरम्यान याठिकाणी गायक कैलास खेर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गर्दी असल्याने संबंधित महिला स्वत:ची सीट सोडून उभी राहून शो पाहायल लागली. त्याचवेळी तिच्याशेजारी उभा असेलल्या 45 वषच्य अभिजीतने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिलेने अभिजीतचा विरोध केला, तेव्हा त्याने सगळ्यांसमोर तिला शिवीगाळ केली.

तिथे तैनात असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी अभिजीतला मंडपातून जाण्यास सांगितलं. महिलेच्या आरोपानुसार, अभिजीत कार्यकर्त्यांसह मला मंडळाच्या कार्यालयात घेऊन केला आणि परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम 354 अ, 506 आणि 36 अंतर्गत भट्टाचार्य यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close