दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी ओलांडली आवाजाची मर्यादा

October 23, 2015 1:06 PM0 commentsViews:

shivsena dasara melava

23 ऑक्टोबर :  शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा काल (गुरुवारी) शिवाजी पार्कवर मोठया उत्साहात पार पडला. पण या मेळाव्यात हायकोर्टाने मर्यादीत केलेल्या आवाज डेसिबल नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार आवाज फाऊंडेशन करणार आहे.

शिवाजी पार्कवर आवाजाचं बंधन घालून शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे शिवसेनेच्या सभेचा आवाज किती होता?, याकडे बारीक लक्ष दिलं गेलं होतं. आवाज फाउंडेशनने शिवाजी पार्कवरच्या या मेळाव्यात शिवसेना नेत्यांच्या भाषणांचे डेसिबल रेकॉर्ड केले. या रेकॉर्डनुसार शिवसेना नेते रामदास कदम यांचा सर्वाधीक म्हणजे 96 डेसिबल तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणांचे 86 डेसिबल आवाज रेकॉर्ड झालेत. तर हायकोर्टाच्या नियमानुसार शिवाजी पार्कवर 68 डेसिबलपर्यंतच आवाजाची मर्यादा आहे. त्यामुळे हायकोर्टाने शिवसेना दसरा मेळाव्यात भाषण केलेल्या सर्व शिवसेना नेत्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे आवाज फाऊंडेशन आज (शुक्रवारी) शिवसेना दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरूद्ध मुंबई पोलिस आयुक्त आणि मुंबई हायकोर्टात तक्रार करणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close