हरियाणात आणखी एका दलिताचा संशयास्पद मृत्यू

October 23, 2015 9:13 AM0 commentsViews:

Harayana dalit

23 ऑक्टोबर : फरिदाबादमधल्या सोनपेड गावात एका दलित कुटुंबातील दोन मुलांना जिवंत जाळण्याची घटना ताजी असतानाच हरियाणातील गोहाना गावातल्या एका 15 वर्षीय दलित आणखी एका मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. कबूतर चोरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या मुलाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्या आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सोनीपत जिल्ह्यातील गोहाना गावात गुरूवारी ही घटना घडली असून हा मुलगा त्याच्या घरी मृत्यूमुखी पडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, मात्र पोलिस कोठडीतच आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगत पोलिसांनीच आमच्या मुलाची हत्या केली, असा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, या मुलाच्या मृत्यूने संतप्त जमावानं रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close