नेत्यांनी जबाबदारीनं वक्तव्य करावी- राजनाथ सिंह

October 23, 2015 3:05 PM0 commentsViews:

rajnath singh23 ऑक्टोबर : बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यं करणार्‍या सत्ताधारी नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी फटकारलं आहे. बोलताना काळजी घ्या, असा सल्ला राजनाथ यांनी व्ही के सिंह आणि किरण रिजिजू यांना दिला आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं म्हणून आपण जबाबदारी झटकू शकत नाही. ज्यावेळी आपण आपलं मत व्यक्त करतो, त्याचवेळी काळजी घेतलेली बरी’, असं राजनाथ यांनी म्हटलं आहे.

हरियाणात नुकतंच दोन दलित मुलांना जिवंत जाळण्यात आलं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. मात्र त्याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘जर एखाद्या कुत्र्याला कोणी दगड मारला, तर त्यासाठी सरकार जबाबदार नाही’असं व्ही के सिंह यांनी म्हटलं होतं. केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंह यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. तर, कायदा धाब्यावर बसवण्यात उत्तर भारतीयांना अभिमान वाटतो असं वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी केलं होतं.
त्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी नेत्यांनी कोणत्याही विषयासंदर्भात विधानं करताना काळजी घ्यावी अशी तंबी सत्ताधारी नेत्यांना दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close