उत्तर भारतीयांनीच केली मुंबईची सुरक्षा- राहुल गांधी

February 1, 2010 5:27 PM0 commentsViews: 5

1 फेब्रुवारीशिवसेना, मनसेने सुरू केलेल्या मराठीच्या वादात आता काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधीही उतरलेत. 26/11च्या हल्ल्यात मुंबईची सुरक्षा करणारे एनएसजी कमांडो यूपी, बिहारचेच होते, असं राहुल गांधी म्हणालेत. मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क आहे, अशी भूमिका घेऊन आक्रमक झालेल्या सेना-मनसेवर त्यांनी हा पलटवार केलाय. बिहारमधल्या गया इथं झालेल्या एका सभेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय. अगोदरच सेनेचा मित्रपक्ष भाजपनेही शिवसेनेला मराठीच्या मुद्द्यावर विरोध केलाय. त्यामुळे तापलेल्या या वादात आता राहुल गांधींनी तेल ओतल्याने हा वाद अधिकच भडकण्याची शक्यता निर्माण झालीय.

close