पुण्यात पुन्हा जळीतकांड, हडपसरमध्ये दोन दुचाकी जाळल्या

October 23, 2015 4:32 PM0 commentsViews:

pune_bike_burn23 ऑक्टोबर : पुण्यात पुन्हा एकदा वाहन जळीतकांड घडल्याची खळबळजनक घटना घडलीये. हडपसर गाडीतळ परिसरातील उन्नती नगरच्या पार्किंगमध्ये दुचाकी जाळण्यात आल्या. पेट्रोल टाकून दोन गाड्या आणि एक सायकल जाळण्यात आली.

बुरुड समाजाचे पदाधिकारी गोपीनाथ पवार यांच्या मालकीच्या या गाड्या आहेत. यामध्ये एक बुलेट, ऍक्टीव्हा आणि सायकलचा समावेश आहे. यामध्ये या दुचाकी आणि सायकल जळून खाक झाल्या आहेत. या प्रकरणी गोपीनाथ पवार यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांवर आरोप केलाय. तर गणपती मंडळातील वादावरून ही घटना घडल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय. पुढील तपास हडपसरचे पोलीस करीत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close