अमरसिंह आणि जयाप्रदा यांची हकालपट्टी

February 2, 2010 8:36 AM0 commentsViews:

2 फेब्रुवारीसमाजवादी पक्षानं अखेर अमरसिंग आणि खासदार जयाप्रदा यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. गेल्या काही महिन्यांत पक्षविरोधी वक्तव्य केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. जयाप्रदा यांनी पक्षनेतृत्वाविरोधात वक्तव्य करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलंय, असं समाजवादी पक्षानं स्पष्ट केलंय.तर समाजवादी पक्षासाठी खस्ता खाणा-या अमरसिंग यांच्या विरूध्द कट रचून त्यांना अडचणीत आणलं जातंय, असा आरोप जयाप्रदा यांनी पुन्हा केलाय. आणि या लढाईत आम्ही अमरसिंग यांच्यासोबत राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.दुसरीकडं अमरसिंग यांनी समाजवादी पार्टीवर पुन्हा अनेक आरोपांच्या फैरी झाडल्यात. महिला आरक्षणाला विरोध करू नका असं पार्टीच्या भल्यासाठीच मी सांगितलं. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊनच पक्ष पुढं जाऊ शकतो. कुशवाह किंवा मुस्लिम या अल्पसंख्याक समाजातल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं जावं. पूर्वांचल, बुंदेलखंड स्वतंत्र केल्याशिवाय उत्तर प्रदेशचा विकास होणार नाही, हेच मी सांगत होतो. पण माझे मुद्दे पक्षाला पटले नाहीत, असे आरोप अमरसिंगांनी केलेत.

close