प्रवाशांना दिलासा, मेट्रोची भाडेवाढ तुर्तास टळली

October 23, 2015 4:46 PM0 commentsViews:

 mumbai_metro_2_jpg_1444852g

23 ऑक्टोबर : मेट्रोच्या प्रवाशांना तुर्तास दिलासा मिळालाय. या महिन्यात मेट्रो ट्रेनच्या तिकिटांत होणारी दरवाढ सध्यातरी टळलीये. 30 नोव्हेंबरपर्यंत आता ही दरवाढ होणार नाहीये.

मुंबई ‘मेट्रो-वन’ प्राईव्हेट लिमिटेड कंपनीकडून लवकरच दरवाढ 110 वर नेण्यात येणार आहे. कोर्टानेही त्याबाबत हिरवा कंदील दिलाय. जोवर राज्य सरकार यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोवर, प्रवाशांची संख्या खालावू नये, या भितीपोटी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता वर्तवली जातेय. शिवाय हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. कोर्टाकडून जोपर्यंत आदेश मिळत नाहीत. तोवर वाढीव दर लागू करणं, अशक्य आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close