सेनेच्या दसर्‍या मेळाव्यावर मुख्यमंत्र्यांचं ‘नो कमेंट’ !

October 23, 2015 8:39 PM0 commentsViews:

CM in UArangabad23 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दसर्‍या मेळाव्यातून शिवसेनेच्या अप्रत्यक्षरित्या भाजपवर केलेल्या टिकेवर उत्तरच द्यायला टाळलंय. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता आपण फक्त जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांवरच बोलणार असल्याच सांगत त्यांनी पत्रकारांच्या सार्‍याच प्रश्नांना बगल दिली.

नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज शहादा तालुक्यातील धांद्रे आणि नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाचे काम पथदर्शी आणि समाधानकारक असून शेतकर्‍यांनी या कामाबद्दल त्यांच्याकडे केलेल्या समाधानाबाबत आनंद व्यक्त केला.

जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामांमुळे 16 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली असून नर्मदा आणि तापीच्या पाण्याचाही वापर करुन एक लाख क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी लवकरच वरिष्ठ स्तरावर बैठक लावणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. तसंच नरेगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विहिरींनाही तात्काळ वीज कनेक्शन देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

नंदुरबार जिल्हा हा कुपोषणाच्या अनुशंगाने संवेदनशील असल्याने या जिल्ह्यातील महत्वाची रिक्तपदेही तात्काळ भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडवणीस यांनी दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close