पाण्यात पाहणारे नेते पाण्यासाठी एकत्र !

October 24, 2015 1:53 PM0 commentsViews:

vikhe_patil_pichad24 ऑक्टोबर : ऐरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता जायकवाडीच्या पाण्यावरुन एकत्र येताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत नगरला काँग्रेस -राष्ट्रवादीची बैठक पार पडली. बैठकीला मधुकर पिचड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरच्या पाण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. सर्वपक्षीय शिष्टमंडळसह लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी विखे पाटलांनी पाण्यावरून प्रादेशिक वाद वाढत असल्यानं सरकारला निश्चित भूमिका घ्यावी लागेल, असं म्हटलंय. पाणी वाटपाला हिंसक वळण लागू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय. नोकरशाहीला डोक्यावर बसून ठेवलंय. नोकरशहा भूमिका घेणार आणी आम्ही पाहत रहायचं का ? असा सवालही विखेंनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close