केडीएमसीचा आखाडा तापला, भाजपने जाहिरात चोरल्याचा सेनेचा आरोप

October 24, 2015 4:35 PM0 commentsViews:

kdmc_sena_add24 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवलीची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसा युतीतला वाद आणखी उफाळतोय. आता तर शिवसेनेने भाजपवर जाहिरात चोरल्याचा आरोप केलाय.

कल्याण-डोंबिवली निवडणुकीसाठी शिवसेनेने एक जाहिरात तयार केली. भाजपने तीच जाहिरात डबिंग करून वापरल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. दोन्ही जाहिरातीत कलाकार एकच आहेत. फक्त जाहिराताच्या शेवटी आपआपल्या पक्षाचा नारा आहे. “सेनेची सत्ता एकहाती म्हणजेच विकासाची सुस्साट गती” अशी टॅगलाईन सेनेची आहे. तर हीच जाहिरात घेऊन भाजपची जाहिरात तयार करण्यात आलीये. यात “गंगा विकासाची साथ भाजपची…आपली मनपा आपला भाजपा” अशी टॅगलाईन वापरण्यात आलीये.

सेनेनं याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलीय. सध्या सोशल नेटवर्किंग साईट्स ही जाहिरात फिरतेय. दरम्यान, भाजपने मात्र जाहिरात चोरीचा आरोप फेटाळून लावलाय. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close