राजापूर बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींना 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

October 24, 2015 6:45 PM0 commentsViews:

rajapur_rape_case24 ऑक्टोबर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधल्या पांगरी गावातल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. कोर्टाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावलीये.

शुक्रवारी संध्याकाळी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. पीडित मुलीच्या जन्मदात्यांनीही तिला मदत करण्याचं नाकारल्यानंतर ती एकटीच स्वतःवरच्या अन्यायाविरोधात उभी राहिली होती. आयबीएन लोकमतने तिची व्यथा मांडली आणि तिच्या लढ्याला आता यश मिळालंय. दरम्यान, पीडित मुलीला आणि तिच्या आईला मुंबई पोलिसांनी संरक्षण दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close