मराठी सीमावासीयांवर कर्नाटक सरकारची दंडेली

February 2, 2010 10:48 AM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारीबेळगावमधल्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारची दंडेली सुरुच आहे. बेळगावमध्ये होणा-या सीमा परिषदेचा मंडप घालण्यास कर्नाटक पोलिसांनी मज्जाव केलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीने 5 फेब्रुवारीला या सीमा परिषदेचे आयोजन केले आहे. पण त्याला कर्नाटक सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. पण तरीही ही परिषद घेण्याचा निर्धार एकीकरण समितीने जाहीर केलाय. महाराष्ट्रातील अनेक नेते या सीमा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सुभाष देसाई, आर. आर. पाटील, जयंत पाटील, बाबासाहेब कुपेकर, एकनाथ खडसे, बाळा नांदगावकर, एन. डी. पाटील यांचा समावेश आहे.

close