हुश्य.., एपीएमसी मार्केटमध्ये डाळीचे भाव घसरले

October 24, 2015 8:30 PM0 commentsViews:

nagpur turdal24 ऑक्टोबर : साठेबाजांवरच्या कारवाईचे परिणाम आता एपीएमसी मार्केटमध्ये दिसू लागले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये डाळ स्वस्त झालीय.सर्वसामान्यांना रडवणार्‍या तूर डाळीचे दर 200 रुपये किलोवरून 160 रुपये किलोवर आले आहे. येत्या काळात डाळींचे दर आणखी कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी काही प्रमाणात का होईना आनंदात जाणार आहे. मात्र सरकार साठेबाजांवर कारवाई करत असतांना साठेबाज मल्टी नॅशनल कंपन्यांवर गुन्हे दाखल करावे आणि जे साठेबाज व्यापारी आहेत त्यांची नावे ही सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी ही एपीएमसीमधील व्यापार्‍यांनी केली आहे.

डाळींच्या साठेबाजांवरील कारवाईनंतर एपीएमसी मार्केटमध्ये डाळ स्वस्त झालीय. सर्वसामान्यांना रडवणारी तूरडाळीचा भाव 200 रुपयांवरून 160 रुपयांपर्यंत आला आहे. तर सर्वच डाळींचे भावही 20 ते 25 रुपयांनी खाली आले आहे. मुगडाळ 125 रुपये किलो होती ती 100 रुपये झाली. चाणा डाळ 75 वरुन 60 रुपये तर उडीद डाळ 160 रूपयांवरुन 140 रूपयांपर्यंत खाली आली. येत्या काही दिवसांत हे भाव आणखी खाली येऊन स्थिरावण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात जाईल असं दिसतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close